कस्तुरी परिमळ नाशितस
2732.
कस्तुरी परिमळ नाशितसे हिंग । ऐसा खळाचा संग जाणिजेती ॥१॥
साकरेचे आळा निंब जो पेरिला । शेवटी कडू त्याला फळे पत्रें ॥२॥
चंदनाचे संगेकं हिंगण वसती । परी चंदनाची याती वेगळीच ॥३॥
एका जनार्दनी हा अभाविकाचा गुण । वमनासमान लखुं आम्ही ॥४॥
