वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

काय विनवावे कोणे तो

🙏 3. संत तुकाराम · ABH-077416 · अभंग क्र. २७१९

2719.
काय विनवावे कोणे तो निवाड । केले माझ्या कोड वचनाचे ॥१॥
आहो कृपनिधी गुणाच्या निधाना । माझ्या अनुमाना नयेचि हे ॥धृपद॥
बहुत करुणा केलेसे भाषन । एक ही वचन नाही आले ॥२॥
माझी काही सेवा होईल पावली । निश्चिंती मानिली होती ऐसी ॥३॥
तुका म्हणे माझी उरली ते आटी । अभय कर कटी न देखेंचि ॥४॥

अर्थ :
देवा तुम्हाला मी आतापर्यंत किती विनंती केली आहे त्याच्याबद्दल तुम्ही कधी निवाडा केला आहे काय आणि माझ्या शब्दाचे कोड कौतुक तुम्ही केले आहे काय ? अहो कृपानिधी गुणाच्या निधाना तुमच्या या अशा वागण्याचा मला काहीच अंदाज येत नाही. अहो देवा मी तुमच्याशी खूप करुणतेने भाषण केले परंतू तुमच्याकडून एकही उत्तर मला आले नाही. तुमच्यापर्यंत माझी कोणती तरी सेवा पोहचेल अशी निश्चिंती मी मानली होती. तुकाराम महाराज म्हणतात, देवा परंतू मी आतापर्यंत परमार्थामध्ये जी काही आटाआटी केली आहे ती सर्व व्यर्थच ठरली असे मला वाटते कारण तुम्ही कमरेवर जे कर ठेवले आहेत ते अभय कर आहेत आणि ते अभय कर माझ्या उपयोगाचे नाही असेच मला दिसत आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग