का रे जन्मला अभागी ।
2741.
का रे जन्मला अभागी । प्रीति न धरी पांडुरंगीं ॥१॥
उत्तर चांगलें रे मुख । रामनाम न म्हणती विख ॥२॥
उत्तम क्रूर ते दिसती । दानधर्म न घडे हाती ॥३॥
उत्तम पद ते शोभती । परि तीर्थयात्रे न जाती ॥४॥
पुष्ट दिसते शरीर । व्यर्थ वांचोनि भूमीभार ॥५॥
ऐसे अभागी जन्मले । एका जन्मार्दनीं वाया गेले ॥६॥
