वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

अनेक दोषाचे काट । जे

🙏 3. संत तुकाराम · ABH-077268 · अभंग क्र. २७१३

2713.
अनेक दोषाचे काट । जे जे गादले निघोंट ।
होती हरीनामे चोखट । क्षण एक न लगता ॥१॥
तुम्ही हरी म्हणा हरी म्हणा । महादोषाचे छेदना ॥धृपद॥
अतिप्रीतीचा बांधला । नष्ट चांडाळी रतला ।
क्षण न लगता नेला । वैकुंठासी हरी म्हणता ॥२॥
अमित दोषाचे मूळ । झाले वाल्मीकासी सबळ ।
झाला हरीनामे निर्मळ । गंगाजळ पै जैसा ॥३॥
हरी म्हणता तरले । महादोषी उद्धरिले ।
पहा गणिकेसी नेले । वैकुंठासी हरी म्हणता ॥४॥
हरीविण जन्म नको वाया । जैसी दर्पणींची छाया ।
म्हणोनि तुका लागे पाया । शरण तया हरीसी ॥५॥

अर्थ :
अनेक दोषानी व पापानी जे मलिन झाले आहेत, असे लोक देखील हरीनामामुळे शुध्द होतात ते ही एक क्षणदेखील न लागता. त्यामुळेच तुम्ही हरीनाम घ्या हरीनाम घ्या ते हरीनामच महादोषाना देखील छेदून टाकीन. अजामिळासारखा दुष्ट मनुष्य चांडाळ जातीच्या स्त्रीशी रत झाला व तिच्याशी अति प्रीतीने बांधला गेला. त्याच्याकडून नकळत हरीनामाचा उच्चार झाला तरी देखील त्याला एकक्षणही न लागता विष्णुदासांनी वैकुंठाला नेला. वाल्मिकीच्या ठिकाणी तर अनेक महादोषाचे मूळ सबळ होऊन राहिले होते. परंतू तो देखील हरीनामाने अगदी निर्मळ झाला अगदी गंगाजळाप्रमाणे निर्मळ झाला. अनेक लोक हरी म्हटले व ते तरले महादोषी देखील हरीनामामुळे उध्दरुन गेले. पाहा गणिका देखील एक वैश्या होती तिने केवळ हरी म्हटल्यामुळे वैकुंठाला नेले. तुकाराम महाराज म्हणतात, जशी दर्पणेची छाया व्यर्थ असते त्याप्रमाणे हरीनामावाचून जन्म वाया जायला नको. म्हणून तर हा तुकाराम म्हणजे मी हरीच्या पायाशी लागलो आणि त्याला शरण गेलो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग