पाहाता हे बरवे झाले
2749.
पाहाता हे बरवे झाले । कळो आले यावरी ॥१॥
मागिलांचा झाला झाडा । त्या निवाडास्तव हे ॥धृपद॥
विसावले अंग दिसे । सरिसे सरिसे अनुभव ॥२॥
तुका म्हणे बरे झाले । देवे नेले गवसूनि ॥३॥
अर्थ :
पाहिले तर माझे खूप चांगले झाले आहे, मागील सर्व संचितकर्मांचा झाडा झाला आहे त्या निवाड्यावरुनच हे मला हे कळले आहे. माझे शरीर देवाच्या संगतीने विसावले आणि सारखे सारखे मला दिसते आहे की, माझे खूप चांगले झाले आहे हा अनुभव मला दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे फार बरे झाले की देवाने मला शोधून त्याच्याबरोबर नेले.
