वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

तुझे दारींचा कुतरा ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077051 · अभंग क्र. २७४८

2748.
तुझे दारींचा कुतरा । नको मोकलू दातारा ॥१॥
धरणे घेतले द्वारांत । नको धरूनी उठवू हात ॥धृपद॥
घातली मुरकुंड । झालो शिरोमणी लंड ॥२॥
तुका म्हणे जगजीवना । ब्रीद पाहे नारायणा ॥३॥

अर्थ :
हे दातारा मी तुझा दारचा कुत्रा आहे मला तू मोकार सोडू नकोस. देवा मी तुझ्या दारात धरणे धरुन बसलो आहे त्यामुळे माझा हात धरुन तू मला उठवून देऊ नकोस. देवा मी माझी मान दोन्ही गुडघ्याच्यामध्ये घालून म्हणजे मुरकुंडी मारुन बसलो आहे आणि इतका निर्लज्ज झालो आहे की, तु मला बळेच काढून जरी दिले तरी मी जाणार नाही इतका मी निर्लज्जाचा शिरोमणी झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे जग्गजीवना नारायणा मी कसाही वागलो तरी तू आपल्या ब्रीदाचा विचार करावा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग