वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आता मी पतित ऐसा साच

🙏 3. संत तुकाराम · ABH-077229 · अभंग क्र. २७३०

2730.
आता मी पतित ऐसा साच भावे । कळो अनुभवे आले देवा ॥१॥
काय करावे ते रोकडेंचि करी । राहिली हे उरी नाही दोघा ॥धृपद॥
येर येरा दृष्टी द्यावे या उत्तरा । यासी काय करा ग्वाही आता ॥२॥
तुका म्हणे मेलो सांगता सांगता । तेचि आले आता कळो तुम्हा ॥३॥

अर्थ :
देवा मी खरोखरच पतित आहे असे मला अनुभवावरुनच कळून आले आहे. देवा आता तुम्हाला काय करायचे असेल ते खुशाल करा कारण आपल्या दोघामध्ये आता संकोच राहिला नाही. देवा आता आपण एकमेकांसमोर उभे असून आपण एकमेकांस बोलण्यासही तयार आहोत मग येथे तिस-या साक्षीदाराची काय गरज आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा जी गोष्ट मी सांगता सांगता मेलो ती गोष्ट आता तुम्हाला कळून आली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग