वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

विस्तार हरिचा चराचर

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090069 · अभंग क्र. १७८

178.
विस्तार हरिचा चराचर जाले । त्या माजी सानुले गुरु दैवत ॥१॥
गुरुविण व्यर्थ विज्ञान न संपडे । ज्ञान हेतुकडे हिंडने व्यर्थ ॥२॥
गुरु परब्रह्म गुरु मात पिता । गुरूविण दैवत नाही दुजे ॥३॥
निवृत्ति म्हणे मज गुरु बोध दिठी । भक्ति नाम पेटी उघडिली ॥४॥

अर्थ:
त्या हरिचा विस्तार संपुर्ण चराचरा व्यापुन उरलेला आहे त्यामुळे त्या व्यापक स्वरुपापुढे माझे गुरु जरी लहान वाटत असले तरी वापरेल्या दैवत उपाधीने ते ही व्यापकच ठरतात. (अणु रेणु या थोकडा तुका आकाशा येवढा ).संसार समजचे विज्ञान गुरुविण कळत नसले व शुध्द ज्ञान जरी झाले तरी त्याचा हेतु हरि झाला नाहीतर ते व्यर्थ ठरते. असे माझे गुरु माझे माता पिताच आहेत व हेच माझे दैवत आहे दुसरे नाही. निवृतिनाथ म्हणतात, गुरु गहिनीनाथांच्या बोधामुळे मला नामभक्तीची पेटी उघडता आली.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग