वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 95. अक्रूराचे मनाशी उद्गार

धन्य ही यमुना धन्य ह

🙏 4. संत नामदेव · ABH-082960 · अभंग क्र. १८३

183.
धन्य ही यमुना धन्य हे गोकुळ । वृक्षादि सकळ धन्य धन्य ॥१॥
धन्य ह्या गोपिका धन्य हे गोपाळ । पक्षादि सकळ धन्य धन्य ॥२॥
धन्य गोवर्धन धन्य वृंदावन । नंदाचा मंदन क्रीडतसे ॥३॥
धन्य ती यशोदा धन्य तिचा पति । अखंड पाहाती मुख ज्याचे ॥४॥
माया घेवोनिया देव गेला राना । ध्वजवज्रांकुश चिन्हा उमटती ॥५॥
नेत्री अश्रुपात उतरे रथाखाले । गडबडोनी लोळे तयावरी ॥६॥
ब्रह्मादिका दुर्लभ येथील ही माती । घेवोनिया हाती मुखी घाली ॥७॥
नामा ह्मणे पुढे चालिला त्वरित । देखे गडियांत परब्रह्म ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग