यमधर्म सांगे दूता ।
184.
यमधर्म सांगे दूता । तुम्हा नाही तेथे सत्ता ।
जेथे होय हरिकथा । सदा घोष नामाचा ॥१॥
नका जाऊ तया गावा । नामधारकाच्या शिवा ।
सुदर्शन यावा । घरटी फिरे भोवती ॥२॥
चक्र गदा घेउनि हरि । उभा असे त्याचे व्दारी ।
लक्ष्मी कामारी । रिद्धिसिद्धिसहित ॥३॥
ते बळिया शिरोमणी । हरिभक्त ये मेदिनी ।
तुका म्हणे कानी । यम सांगे दुतांचे ॥४॥
