स्त्री जन्म ह्मणवुनी
176.
स्त्री जन्म ह्मणवुनी न व्हावे उदास । साधुसंता ऐसे केले जनी ॥1॥
संतांचे घरची दासी मी अंकिली । विठोबाने दिल्ही प्रेमकळा ॥2॥
विदुर सात्त्विक माझिये कुळीचा । अंगिकार त्याचा केला देवे ॥3॥
न विचारिता कुळ गणिका उद्धरिली । नामे सरती केली तिही लोकी ॥4॥
ऋषींची कुळे उच्चारिली जेणे । स्वर्गावरी तेणे वस्ती केली ॥5॥
नामयाची जनी भक्तिते सादर । माझे ते साचार विटेवरी ॥6॥
