अक्रुराचे गोकुळी गमन
181.
अक्रुराचे गोकुळी गमन
कंसासुर सारे करोनि विचार । धाडती अकूर गोकु-ळासी ॥१॥
अकुरा आनंद झाला असे फार । पाहीन श्रीधर डोळे-भरी ॥२॥
आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक । वैकुंठनायक पाहीन मी ॥३॥
उजवे जाती काक वाम जाती मृग । पाहीन श्रीरंग स्वामी माझा ॥४॥
शुभ हे शकुन मार्गी हे होताती । पाहीन भूपती वैकुंठींचा ॥५॥
येथूनिया माझी सरली येरझार । कंसाने उपकार केला मोठा ॥६॥
आजी माझे पितर उद्धरती सकळ । पाहींन गोपाळ कृपासिंधु ॥७॥
नामा ह्मणे आला गोकुळासन्निध । ह्लदयी आनंद न समाये ॥८॥
