वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ७, बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८

मदनमूर्ति तू डोळ्या

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074885 · अभंग क्र. १८१

181.
मदनमूर्ति तू डोळ्या । आसुमाय जालासी ।
सेखी कामिनीचेनि पक्षे । ती पुराण पिशाच करिती रया ॥
गोजिरिया गुण निधाना । बापा गुंतल्यापणाचिया साठी ।
वेद विदेही विचारिता तेथे । आगम काढिती आटी रया ॥थ्रु ॥
सायुज्यता जालीया । मग सादृश्यपण तेथे लोपे ।
अवयव अळंकार मुरालिया । तेथे दृष्टि परमार्थ थोपे रया ॥
तत्त्वपणाचेनि समरसे । तेथे पुरोनी उरे ते शेष ॥
रखुमादेविवरु विठ्ठल । गगनी नक्षत्र पडे नुरेचि तेथ रेख रया ॥

अर्थ :
हे श्रीकष्णा तुम्ही प्रत्यक्ष मदनच आहात. ते डोळ्याची तृप्ती न करणारे रुप आहे त्याला उपमा देण्सास सुंदर स्त्रीचे रुपक वेदांनी वापरले तरी ते वेडे ठरले. ह्या गोजिऱ्या रुपावर गोपी मोहित झाल्या व विदेहाला पोहचल्या त्याचा विचार करणे वेदांनाही जमले नाही. अशारितीने गोपी व त्याची सायुज्यता झाली. तेथे दृष्यपण संपले जसे सोने अलंकारात लुप्त झाले. तेथे फक्त परमार्थ राहिला. जसे तत्वपणाचे सामरस्य होते तेथे सगळे जाऊन तो एकटा उरतो. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल, हे सर्व नक्षत्र तारांगणात लोप पाऊन एकटे उरतात असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग