वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ५, संत तुकाराम गौळणी

काय उणे का करिशील चो

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073226 · अभंग क्र. १७७

177.
काय उणे का करिशील चोरी । किती सांगो तुज नाइकसी हरी ।
परपरता तू पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥
माया करुणा हे करिते बहुत । किती सोसू या जनांचे आघात ।
न पुरे अवसरु हे चि नित्यानित्य । तूंचि सोडवी करूनि स्थिर चित्त वो ॥धृ॥
बहुत कामे मी गुंतलिये घरी । जासी डोळा तू चुकवूनि हरी ।
करिता लाग न येसी चपळभरी । नाही सायासाची उरो दिली उरी वो ॥२॥
तुज म्हणीये मी न संगे अनंता । नको जाऊ या डोळिया परता ।
न लगे जोडी हे तुजविण आता । तुकयास्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग