वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

माता पिता नाही बंधु

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090117 · अभंग क्र. १८३

183.
माता पिता नाही बंधु बोध कांही । सर्वसम डोही वर्तताती ॥१॥
सर्व आम्हा राम भजनी निष्काम । दिन कळा नेम भजनशीळ ॥२॥
दया वसे देही क्षमा ते माधवी । कासवी शोभवी जनी इये ॥३॥
निवृत्ति म्हणे ऐसा गयनि सद्‌गुरु । उपदेश पूरु अमृताचा ॥४॥

अर्थ:
आई बाप बंधु हे उपाधीने वेगळे वाटले तरी एकाच वंशाचे असतात तसेच सर्व स्वरुपात तो परमात्मा एकत्वाने असल्याने सर्वा ठायी सम आहे. आम्ही निष्काम राम भजन करतो ते दिन काला नेमावर नाही तर सतत जन करणे ह्या प्रमाणे आहे. कासवीच्या नेत्रातुन केलेल्या प्रेमपान्ह्यामुळे ती पिले जशी शोभुन दिसतात तसे सतत भजनामुळे दया व क्षमा शरिरात उतरल्याने भक्त शोभुन दिसतात. निवृतिनाथ म्हणतात, त्या कासवीच्या सारखा उपदेशाचा पान्हा गुरु गहिनीनी माझ्यावर धरल्या मुळे ते माझे सदगुरु झाले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग