भ्रांती माझे मन प्रप
183.
भ्रांती माझे मन प्रपंची गुंतले । श्रवण मनन होउनी ठेले ॥1॥
बापे बोधिले बापे बोधिली । बोधुनी कैसी तद्रुप झाली ॥2॥
निज्रध्यासे कैसा अवघाचि सापडला । की विश्वरुपी देखिला बाईयांनो ॥3॥
नामयाची जनी स्वयंबोध झाला । अवघाचि पुसिला ठाव देखा ॥4॥
