वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ४. गौळणी

वेणु वाजवीत यमुनेच्य

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089806 · अभंग क्र. १७८

178.
वेणु वाजवीत यमुनेच्या तटी ।
उभा कान्हया सावळा जगजेठी ।
भोवती गोधने वो थाटी ।
एकोनि गवळणी धावती उठाउठी वो ॥१॥
ऐसा जनमन मोहनरंजवणा ।
गुणी गुणातीत नंदाचा पोसणा ।
करुनि अकर्ता हा सृष्टयादिरचना ।
विश्वी विश्वातीत अलक्ष देखणा वो ॥२॥
बैसोनि विमानी याच्या पाहो येति खेळा ।
देव सकळही मिळोनिया पाळा ।
वोघ कुंठित या यमुनाच्या जळा ।
वरुषे ब्रम्हानंद नरनारी बाळावो ॥३॥
जलचर भूचर खेचर वनचरें ।
लुब्ध होऊनियां वेणेचिया स्वरें ।
राहिलीं तटस्थचि मानसें शरीरें ।
नेणती वैरभाव एकत्र परस्परें वो ॥४॥
पवन निश्चलचि होऊनिया ठेला ।
सूर्य अस्तमाना जाऊ विसरला ।
वत्से न पिती देहभाव गेला ।
मुखींचा कवळ गाईमुखींचि राहिला वो ॥५॥
ऐसा स्वानंदाचा आला महापुर ।
कृष्णवेणुध्वनी लोधले अंतर ।
नेत्री गळताती प्रेमाचे पाझार ।
निळा म्हणे देही देहा अनाचार वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग