वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

आमचा साचार आमचा विचा

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090030 · अभंग क्र. १८१

181.
आमचा साचार आमचा विचार । सर्व हरिहर एकरूप ॥१॥
धन्य माझा भाव गुरूचा उपदेश । सर्व ह्रषीकेश दावियेला ॥२॥
हरिवीण दुजे नेणे तो सहजे । तया गुरुराजे अर्पियेले ॥३॥
हरि हेंचि व्रत हरि हेंचि कथा । हरिचिया पंथा मनोभाव ॥४॥
देहभाव हरि सर्वत्र स्वरूप । एक्या जन्मे खेप हरिली माझी ॥५॥
निवृत्ति हरी प्रपंच बोहरी । आपुला शरीरी हरि केला ॥६॥

अर्थ:
शिव व विष्णु हे दोन्ही एकच आहेत हाच आमचा विचार आहे व हाच आमचा आचार झाला आहे. श्री गुरुच्या उपदेशावर पुर्ण भाव ठेवल्यामुळे त्यांनी मला त्या हृषीकेशाचे स्वरुप दाखवले आहे. त्यामुळे त्या हरि वाचुन दुसरे काही नाही हे कळल्यामुळे जे काही राहिले ते म्हणजे अज्ञान अविद्या मी श्री गुरु गहिनीना अर्पण करुन मी फक्त त्या हरिरुपालाच विनटलो. हरिच माझे व्रत व कथा झाल्यामुळे त्या हरिच्या पंथाला मी मार्गस्थ झालो. त्यामुळे माझा देहभान गळला व मी हरिरुप असल्याची जाणिव झाली व ह्याच जन्मात माझ्या जन्म मरणांच्या खेपातुन सुटका झाली. निवृतिनाथ म्हणतात देहभावालाच संपवुन हरिरुप दिल्यामुळे माझा प्रपंच ही निरसला. किंवा प्रपंच ही हरिरुप झाला.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग