वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 88. वनविहारानंतर गोप गोपिकांचे नंदागृही आगमन

वनविहारानंतर गोपो गो

🙏 4. संत नामदेव · ABH-083480 · अभंग क्र. १७५

175.
वनविहारानंतर गोपो गोपिकांचे नंदागृही आगमन

गोपिकेचा मेळा आला गृहाप्रती । काय त्या ह्मणती नंदालागी ॥१॥
परब्रह्म साक्षात्‍ क्षीरसागरवासी । त्या कैसा धा-डसी वनामध्ये ॥२॥
ब्रह्मा आणि इंद्र आले गोकुळासी । वर्णिती कृष्णासी तुह्मी देखा ॥३॥
तेहेतीस कोटी देव जयांते प्रार्थित । त्यासी अरण्यांत रुपती कांटे ॥४॥
दैत्यांचा हा भार जाहला पृथ्वीसी । कंस वधायासी आला येथे ॥५॥
ज्याजसाठी फार श्रम-ताती योगी । कैलासाचा योगी ध्यान करी ॥६॥
भ्रांती कांरे तुज पडे वेळोवेळा । पाहातोसी डोळा चरित्रास ॥७॥
नामया सुकृत झाले असे फार । म्हणोनी विचार नाठवेची ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग