वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ७, बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८

लक्ष लावून अंतरी । क

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074886 · अभंग क्र. १७८

178.
लक्ष लावून अंतरी । कृष्णा पाहाती नरनारी ।
लावण्य सागरु हरि परमानंदु ॥
छंदे छंदे वेणु वाजे । त्रिभुवनी धनुगाजे ।
उतावेळ मन माझे । भेटावया ॥
ब्रह्मविद्येचा पुतळा । गाई राखितो गोवळा ।
श्रुति नेणवे ते लीळा । वेदा सनकादिका ॥
भूतग्रामीचा परेशु । तापत्रयाचा करी नाशु ।
आड धरुनी गोपवेषु । वत्से राखे ॥
रासक्रीडा वंदावनी खेळे । इंदुवदन मेळे ।
उद्धरी यदुकुळे । कुळदीपके ॥
निवत्तीदासाचा दातारु । बापरखुमादेविवरु ।
भक्ता देतो अभयकरु । क्षणक्षणामाजी ॥

अर्थ :
परमानंद व लावण्याचा सागर असलेल्या कृष्णाकडे नरनारी अंतरातुन लक्ष देऊन पाहतात. त्याच्या सुमधुर वेणुवादनाने संपुर्ण त्रिभुवन कोंदाटुन गेले आहे व त्या मुळे त्याला भैटायला मी उताविळ आहे. जो ब्रह्मविद्येचा पुतळा आहे तो गाई राखत आहे हि लीला वेद व श्रुतीना ही कळत नाही. जो ह्या जगताचा राजा आहे जो सर्व प्रकारचे तापाचे हरण करतो तो गोपवेश करुन गोधन राखत आहे. यदुकुळातील त्या यादवाने आपल्या मुखकमलाने मोहित करुन त्या गोपाना रासक्रीडा करायला लावली व त्यांचा उध्दार केला. माझे पिता व रखुमाईपती व माझे गुरु निवृतीनाथ असे दाता आहेत की क्षणात आपल्या भक्तांना अभय देतात असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग