वामसव्य दोहीकडे । दे
179.
वामसव्य दोहीकडे । देखू कृष्णाचे रुपडे ॥1॥
आता खाले पाहू जरी । चहूकडे दिसे हरी ॥2॥
चराचरी जे जे दिसे । ते ते अविद्याची नासे ॥3॥
माझे नाठवे मीपण । तेथे कैचे दुजेपण ॥4॥
सर्वाठायी पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळा ॥5॥