शेष प्राक्तनाची रक्ष
176.
शेष प्राक्तनाची रक्षा भरूनिया ।
नेली ते अद्वयानंदतीर्थी ॥१॥
त्रिकोण वेदिका त्रिगुणाचा देह ।
सिंपोनी विदेह रूप केले ॥२॥
निर्गुणाचें भाव येती जे आठही ।
गोमूर्त्र ते पाही तयावरी ॥३॥
लाविल्या पताका सात्त्विक भावना ।
मंत्राची धारणा ब्रह्मनिष्ठा ॥४॥
ऐसा सिंचनविधी संपादिला येथे ।
पुढे मोक्षपंथ क्रियायोग ॥५॥
बहेणि म्हणे क्रिया करिता स्वदेहाची ।
माझी मीचि साची होउनि ठेले ॥६॥
