सद्गुरू वोवाळा वोवाळ
180.
सद्गुरू वोवाळा वोवाळा ।
उजळुनी निज-ज्योतिज्वाळा ॥१॥
पिंड हारपला पिंडी ।
तेज व्यापिले ब्रह्मांडी ॥२॥
शंतिसुखाचे आसन ।
अद्वय बोधाचे पूजन ॥३॥
चिद्घन चिदानंदगाभा ।
सच्चिदानंद निजप्रभा ॥४॥
तेज प्रकाशले लोचनी ।
बहेणि हारपली चिद्घनी ॥५॥
