वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ७, बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८

हरिप्रेम सरोवरी । क्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074892 · अभंग क्र. १७६

176.
हरिप्रेम सरोवरी । क्रीडती ये मदनकुहरी । प्रेम सरोवरी ये ॥१॥
चांदिणे निर्मळ । चंदने धवळतिये ।
पैल वृदांवनी वासुगा गोविंदु खेळतिये ॥धृ॥
प्रकृति भक्ति परमातु । मातु मा परमहंसु ।
ज्ञानदेवो म्हणे निवृत्तिदासु ॥२॥

अर्थ :
श्रीकृष्णावर असलेले प्रेम हे सरोवर व मदनाची गुहा आहे असे त्या गोपींना वाटुन त्या त्याच्या जलक्रीडा करत आहेत. त्यावेळी कृष्णप्रेमाचे लख्ख टिपुर चांदणे पडले आहे. व अंगाला प्रेमाचे चंदनी उटणे लावले आहे अशा थाटात तुळशी वृदांवनात असलेल्या कृष्णासोबत त्या गोपिका क्रिडा करतात. तो कृष्ण व गोपींचा खेळ परमहंस स्थितीत पोहचलेल्या निवृतीदास माऊलीनी सांगितला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग