संतमहानुभाव येती दिग
184.
संतमहानुभाव येती दिगंबर । नम्रतेचे घर विरळा जाणे ॥1॥
निवाले मीपण ते जे ठायी नाही । सोहं शब्द सोई तेथे कैची ॥2॥
पाहता हा कोण दाविता हा कोण । पाहता दाविता हे खूण विरळा जाणे ॥3॥
नामयाची जनी वस्तु झाली । अवघ्यांसी बुडाली परब्रह्मी ॥4॥
