धन्य पुंडलिका बहु बर
178.
धन्य पुंडलिका बहु बरे केले । निधान आणिले पंढरिये ॥१॥
न करी आळस आलिया संसारी । पाहे पा पंढरी भूवैकुंठ ॥२॥
न पविजे केल्या तपाचिया राशी । ते जनलोकासी ।
दाखविले ॥३॥
सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा निवडिला ॥४॥
विष्णुपद गया रामधाम काशी । अवघी पायापाशी विठोबाच्या ॥५॥
तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ हा नाश अहंकाराचा ॥६॥
