घट फुटलियावरी ।
181.
घट फुटलियावरी ।
नभ नभाचे भीतरी ॥१॥
ऐसा देह गेलियाने ।
उरे स्वरूप चिद्धन ॥२॥
जळ आटलिया जाण ।
प्रतिबिंब म्हणे कोण ॥३॥
लागली कपुरासी ।
अग्निरूप नाही म्हैसी ॥४॥
बहेनि ऐसे नाम माया ।
गेले ध्याऊनी अद्वया ॥५॥
181.
घट फुटलियावरी ।
नभ नभाचे भीतरी ॥१॥
ऐसा देह गेलियाने ।
उरे स्वरूप चिद्धन ॥२॥
जळ आटलिया जाण ।
प्रतिबिंब म्हणे कोण ॥३॥
लागली कपुरासी ।
अग्निरूप नाही म्हैसी ॥४॥
बहेनि ऐसे नाम माया ।
गेले ध्याऊनी अद्वया ॥५॥