घाली कवाड टळली वाड र
178.
घाली कवाड टळली वाड राती । कामे व्यापिली का पडिली दुश्चित्ती ।
कोणे लागला गे सदैवेचे हाती । आजि शून्य शेजे नाही दिसे पती वो ॥१॥
बोले दूतिकेशी राधा हे वचन । मशी लाघव दाखवी नारायण ।
म्हणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशी न बोले कळला मज पूर्ण वो ॥धृ॥
धाडिले गरुडा आणिले हनुमंता । तै पाचारिले होउनि येई वो सीता ।
लाजिन्नली रूप न ये पालटिता । झाला भीमकी आपण राम सीता वो ॥२॥
सत्यभामा दान करी नारदासी । तै कळला वो मज हृषीकेशी ।
तुळे घालिता न ये कनक वो रासी । सम तुके एक पान तुळसी वो ॥३॥
मज भुली पडली कैशापरी । आम्हा भोगूनि म्हणे मी ब्रम्हचारी ।
दिली वाट यमुने माये खरी । तुम्हा आम्हा न कळे अद्यापवरी वो ॥४॥
जाणे जीवींचे सकळ नारायण । असे व्यापूनि परी न दिसे लपून ।
राधा संबोखिली प्रीती आलिंगून । तुका म्हणे येथे भावचि कारण वो ॥५॥
