टिपरी - अभंग १८२ ते
182.
टिपरी - अभंग १८२ ते १८३
खेळसी टिपर्या घाई रे । वाचे हरिनाम गाई रे । टिपरीस टिपरी चुकुं जाता भाई । पडसी यमाच्या घाई रे ॥१॥
सहा चार अठरा गड्यांचा मेळा रे । टिपरीयांचा खेळ खेळा रे । एका खेळा दोन्ही गुतला । यमाजी घालीला डोळा रे ॥२॥
वाय खेळ खेळतीसी बाळा रे । सावध होई पाहे डोला रे । एक एका जनार्दनी शरण जाता । चुकशील कळिकाळारे ॥३॥
