वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ७, बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८

परब्रह्म सांवळे । गो

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074887 · अभंग क्र. १८०

180.
परब्रह्म सांवळे । गोपवेशे निराळे ।
हृदयकमळी स्थिरावले । काय सांगो ॥
काया वाचा मने । पाहे जो पाहाणे ।
तव नवलाव होया । निर्गुण रया ॥
नामरूप गोडी । हेचि आवडी आता ।
न विसंब सर्वथा । तुजलागी ॥धृ॥
जगड् व्याळ प्रपंचभान । हे तुज नातुडे हन ।
वाया भोगिसी जाण । काय रे याचे ॥
तुझीच बुंथी तुज । न कळे याचे चोज ।
केवी वर्णिसी सहज । गुणे रया ॥
म्हणोनि दृष्टी । चोरुनि पडे मिठी ।
मन चोरुनि या पुढतपुढती । तुजचि माजी ॥
बापरखुमादेविवरा । विठ्ठला उदारा ।
येणेचि नाही त्रिशुद्धि । येणे निवृत्तीराये खुणा ।
दाऊनिया सकळ गुणी गुणातीत । तुटली आधी रया ॥

अर्थ :
काय सांगु ते गोपवेशातील सावळे परब्रह्म माझ्या हृदयकमळात स्थिरावले आहे. काया वाचा मनाने त्याला पहायला गेले तर नवल झाले ते निर्गुण असल्याचे जाणवले. त्यामुळे फक्त तुझ्या नाम व रुपाची गोडी धरुन फक्त तुझ्यावर, इतर ठिकाणी न जाता विसंबलो आहे. ह्या जगडंबर प्रपंचाचे तुला भान नाही आवड नाही तरी तो तु भोगत असतोस हे समजत नाही. हे सगुणरुप ओढुन घेतलेले रुप तुलाच कळत नाही. त्याचे वर्णन कसे करायचे हे सुचत नाही. त्या करिता सगुणच्या साहय्याने तुझे निर्गुण स्वरुप जाणावयास वाटत आहे. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल हे उदार आहेत. त्यांच्या पाशी त्रिशुध्दी असुन सर्व गुण असुन गुणातीत ही तेच आहेत अशी खुण निवृत्तीनाथांनी दाखवली माझी चिंता तोडली असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग