वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

जेथे नाही वृंदावन ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076383 · अभंग क्र. १८४

184.
जेथे नाही वृंदावन ।
तेचि जाणावे स्मशान ॥१॥
राहू नये तये ठायी ।
एक घडी पळ पाही ॥२॥
जेथे असे तुळसीपान ।
तेथे असे नारायण ॥३॥
बहेणि म्हणे विष्णु नांदे ।
तुळसीचे ठायी मोदे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग