सांगसि सकळा मृत्यु प
183.
सांगसि सकळा मृत्यु पाचा दिवसाचां ।
प्रायश्चित्तविधि सारूनि द्विज पुजिले हरि वाचा॥
सकळा आशीर्वचने देउनि, गीतेचा च्या ) ।
स्मरणी तत्पर होउनि अष्टादश वाचा ॥१॥
जयदेवी जयदेवी जय बहेणाबाई ।
अंती आरति उजळुनि मानस तव पायी॥धृ॥
ज्ञानेश्वरिचे करिसी पारायण अंती ।
दिननिशी सावध करणे लावुनि निजपंथी ।
रामस्मरणी तत्पर वाचा रूपवंती ।
न कळे तव रूपमहिमा जाणितला संतीं ॥२॥
दशनादाचे ध्वनी तू सांगसी सकळा ।
वैष्णव जयजयकारे तुळसीच्या माळा ।
आले हरिहरब्रह्मादिक जन ऋषिमेळा ।
न कळे पामर जन या भगवत्पथलीळा ॥३॥
धन्य शतषोडशवरि द्वाविंशतकाळी ।
धन्य अश्विन शुद्ध प्रतिपदा बुधमेळी॥
सद्गुरूभजनी सावध राहुनी ते काळी ।
त्यागुनि देहा निजपद पावसि वनमाळी ॥४॥
धन्य घटिका धन्य पळ लव ते जाणा ।
धन्य धन्य जन ते देखति तव निधना॥
धन्य प्रणितातीर्थ शिवपुर निजस्थाना ।
तेथे तू स्थिर राहुनी करिसी गुरूध्याना ॥५॥
आरती याचि थाटे गायन जन करिती ।
रामस्मरणे सर्वहि आनंदे वदती॥
नणो स्वर्गीहुन त्या देवांच्या पंगती ।
आल्या मज्जनवेळे त्या प्रणितातीर्थी ॥६॥
मृदंग वाद्य नानापरीच्या गजराने ।
तुलसी बुक्का उधळुनि मिरवत नगराने ।
गर्जत हरिनामाच्या श्रेणी अधराने ।
प्रणितातीर्थी मज्जन केले मग ध्याने ॥७॥
पूर्वे हनुमंत शोभे सहित-अश्वत्थे ।
पश्चिमभागी सुस्थळ रामेश्वर जेथे॥
उत्तरभागी सन्निध हे प्रणितातीर्थ ।
दक्षिणभागी भगवती दुर्गा माता ते ॥८॥
ऐसे स्थळ अति उत्तम शिवपुर ते स्थानी ।
समाधि घेउनि राहसि तू देह अवसानी॥
त्रिकाळ आरती-पुजने इच्छित फळदानी ।
पावती तव कर वरदे सुत विठ्ठल चरणी ॥९॥
