वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 20. पिंगा - अभंग १७७ ते १७८

निराकाराचा आकार झाला

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087086 · अभंग क्र. १७८

178.
निराकाराचा आकार झाला । त्यांतच माझा पिंगा जन्मला । निराकारासी घेऊन आला ॥१॥
माझा पिंगा घालितो धिंगा ॥धृ.॥
पिंग्यापासुन शंकर झाला । ढवळ्या नदींवर बसुन आला । माझ्या पिंग्याने धक्का दिला । माझा ॥२॥
पिंग्यापासुन मच्छ झाला । शंकसुराचा प्राण घेतला । चारी वेद घेउनी आला॥माझा ॥३॥
पिंग्यापासुन कूर्म झाला । पर्वत पाठीवर घेतला । चौदा रत्‍ने घेऊन आला॥माझा ॥४॥
पिंग्यापासुन वराह झाला । हिरण्याक्षाचा प्राण घेतला । पृथ्वी वरती घेऊन आला॥माझा ॥५॥
पिंग्यापासुन नरसिंह झाला । हिरण्यकश्यप दैत्य वधिला । प्रह्लाद भक्त रक्षिला॥माझा ॥६॥
पिंग्यापासुन वामन झाला । बलीदान मांगु लागला॥बळी पाताळी घातला॥माझा ॥७॥
पिंग्यापासुन भार्गव झाले । मातेचे शिर छेदियेलें । अवघे राजे नाहीसे केलें॥माझा ॥८॥
पिंग्यापासुन राम झाले । पितृवचन सांभाळिले । रावण कुंभकर्ण मरिले॥माझा ॥९॥
पिंग्यापासुन कृष्ण झाला । कंसाचा प्राण घेतला॥गोकुळ सोडुन मथुरेसी आला॥माझा ॥१०॥
पिंग्यापासुन बौद्ध झाला । दिले जगन्नाथ नांव त्याला । भक्तांनी दहींभात चारिला॥माझा ॥११॥
ऐसा निराकाराचा पिंगा । त्यांत माझा श्रीरंगा । एका जनार्दनी पाडुरंग । माझा पिंगा घालितो धिंगा ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग