केशीदत्त्याचा वध
179.
केशीदत्त्याचा वध
माराया कृष्णासी । कंसे पाठविला केशी ॥१॥
बहु असे तो प्रतापी । आला अश्वाचिये रूपी ॥२॥
देवा डसाया धांवला । धरूनि पायी झुगारिला ॥३॥
मुखी देऊनिया हात । श्वास कोंडी जगन्नाथ ॥४॥
नामा ह्मणे पडले प्रेत । हर्ष सुरवरा बहुत ॥५॥
