वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 95. अक्रूराचे मनाशी उद्गार

अक्रूराचे मनाशी उद्ग

🙏 4. संत नामदेव · ABH-082959 · अभंग क्र. १८२

182.
अक्रूराचे मनाशी उद्गार

चौदाजणी ज्याच्या चरणाते पूजिती । त्याची घेईन माती आपुल्या शिरी ॥१॥
एकांती अर्चन करिती धूर्जटी । त्यांसी बोलेन गोष्टी आवडीने ॥२॥
सप्तऋषि ज्याचे वर्णिताताती गुण । करीतसे ध्यान ब्रह्मा ज्याचे ॥३॥
चारी वेद ज्याची वर्णिताती कीर्ति । करिताती स्तुति साहीजण ॥४॥
तेहेतीस कोटि देव जयाते पूजिती । श्रुति वर्णिताती गुण ज्याचे ॥५॥
लक्षुमीचा पति ध्याती सनकादिक । पाहीन श्रीमुख एकवेळा ॥६॥
पृथ्वीचा हा भार करावया दूर । ह्मणोनि अवतार वेत असे ॥७॥
नामा ह्मणे आला यमुनेजवळी । उतरला खाली रथाचिया ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग