संतभार पंढरींत । कीर
177.
संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥1॥
तेथे असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा ॥2॥
रंग भरे कीर्तनांत । प्रेमे हरिदास नाचत ॥3॥
सखा विरळा ज्ञानेश्वर । नामयाचे जो जिव्हार ॥4॥
ऐशा संता शरण जावे । जनी म्हणे त्याला ध्यावे ॥5॥.
