वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 23. टिपरी - अभंग १८२ ते १८३

अनुहत टिपरी घाई खेळ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085096 · अभंग क्र. १८३

183.
अनुहत टिपरी घाई खेळ जाणे तो भाई रे । खोटा खेळ खेळोनि काय स्वतः अनुभव घेई रे ॥धृ.॥
मत्स्येद्रं कुळीं एक गोरख जाला । तो बहुत खेळ खेळला रे । पवन साधुनि अष्टांग योगे तेणेंचि बळे मातला रे ।
खेचरीं भूचरीं चाचरी धरुनीं अगोचरी मिळाली रे । गोल्हाट योग साधुनि तेणे काळ तो जिंकुनि गेला रे ॥१॥
निवृत्तिचा पोर एक ज्ञाना जाण तो खेळियामाजी शहाणा रे । कवित्व केला प्रकाश मातला प्रवृत्ति गाळिले घाणा रे ।
असोनि भेला नसोनि गेला काळ केला आंकणा रे । भले भले गडी मिळाविले तेणे अकाय सांगु कवणा रे ॥२॥
जनार्दनाची सात पाँच पोरें त्यामाजी लाडका येका रे । एकही साधन न करी परी तो बळेचि मातला फुका रे ।
आपपर देही कांहींच नेणे रायासी म्हणे तो रंका रे । भलेंभले गडी मेळवोनि तेनें खेळ दाविला असका रे ॥३॥
तिघा जिणांचें खेळणें जाले चवर्थे एक उठविलें रे । अनन्यभावें सदगुरुचरणीं गुरुसी शरण गेले रे ।
भवासी न भ्यालं कळलें म्हणोनि तिघांचि समान जाले रे । आपण जैसे पुर्ण तैसे एका जनार्दनी केले रे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग