प्रकरण :- ॥ नाम ॥
179.
प्रकरण :- ॥ नाम ॥
अखंड चिंतन मनासी । तोचि आवडे देवासी ।
या परते साधनासी । दुजे मानसी धरू नका ॥१॥
हेचि तपाचे महातप । पूजा ध्यान अवघा जप ।
आन नाही बा संकल्प । नाम जप सर्वदा ॥२॥
मग सुखा नाही पार । अवघा देखे जगदाकार ।
दुजा न देखे संचार । आपपर सारिखे ॥३॥
अवघी निवारली गुंती । उडोनि गेली माया भ्रांती ।
चोखा म्हणे कमळापती । दुजी विश्रांति नको मज ॥४॥
