वृषभधारी रिडा सुराचा
176.
वृषभधारी रिडा सुराचा वध
वृषभाच्या रूपे आला रिठासूर । इंद्रादि सुरवर भीती त्यासी ॥१॥
बहू देतो त्रास गोकुळींच्या जना । धांवधांव कृष्णा मारी याला ॥२॥
जगजेठी तेव्हा धरितसे शिंगे । सारितसे मागे भुजाबळे ॥३॥
पाडोनिया खाली दिल्हा पाय वर । मारिला असुर नामा म्हणे ॥४॥
