वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ४. गौळणी

येकले न कंठेचि म्हणो

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089804 · अभंग क्र. १७७

177.
येकले न कंठेचि म्हणोनिया येणे ।
केली निर्माणे वो चौदाही भुवने ।
गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे ।
पांचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो ॥१॥
ऐसा लाघविया मायासूत्रधारी ।
येकला येकटाचि झाला नानाकरी ।
स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी ।
तो हा नंदनंदन सये बाळब्रम्हचारी वो ॥२॥
याचिये नाभिकमळी जन्म चतुरानाना ।
याचिया निजप्रभा प्रकाश रविकिरणा ।
याचिया महातेज हुताशना ।
येणेचि पढवून वेद केला शहाणा वो ॥३॥
याचिया द्रावपणे समुद्रासी जळ ।
याचिया चपळपणे पवन हा चंचळ ।
याचिया अवकाशे आकाश पघळ ।
याचिया घृतिवळे अवनी हि अढळ वो ॥४॥
येणोंचि मेरुस्तंभ अचळ धरियेला ।
दिशादिग्पाळांसी येणेचि ठाव दिधला ।
विधिविधानाचा शास्त्रा बोध केला ।
येणेचि सुरपति स्वर्गी बैसविला वो ॥५॥
भोगूनि अंगना हा बाळब्रम्हचारी ।
येकला जेथे तेथे सोळा सहस्त्रा घरी ।
आम्हा तुम्हा भोगूनि अलिप्त मुरारी ।
निळा म्हणे ऐसा विवादति नारी वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग