वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 90. नारदाची कंसाशी मसलत

नारदाची कंसाशी मसलत

🙏 4. संत नामदेव · ABH-082936 · अभंग क्र. १७७

177.
नारदाची कंसाशी मसलत

कंसाचिया घरा आला नारदमुनी । एकांती बैसोनी सांगतसे ॥१॥
सातवा जो गर्भ जिराला ह्मणती । रोहिणी प्रस-वती बळीराम ॥२॥
आठवा जो पुत्र देवकीसी झाला । वसुदेवे नेला नंदाघरी ॥३॥
यशोदेची कन्या घेऊनिया येत । गेली आका-शांत मारीता जे ॥४॥
तुझिया मानसी अशंका येईल । होते रक्ष-पाळ माझे तेथे ॥५॥
ईश्वराची माव न कळे कोणाला । कळले हे मजला त्याच्याकृपे ॥६॥
घेऊनिया शस्त्र उठला त्वरीत । करितो मी अंत वसुदेवावा ॥७॥
तयेवेळी ह्मणे ब्रह्मयाचा सूत । ऐक तुज मात सांगतो मी ॥८॥
आधी मारी पुत्र तुझे जे का वैरी । असे तुझ्याघरी मग यासी ॥९॥
सांगोनिया ऐसे शांतविले त्यासी । गेला गोकुळासी नामा ह्मणे ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग