अवघा आनंद राम परमानं
181.
अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥
हेचि साधन निके जगासी उद्धार । आणिक साचार दुजे नाही ॥२॥
क्रोधांचे न पडता आघात । वाचे गाता गीत राम नाम ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथे कळिकाळांचा रीघ नाही ॥४॥