वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ४. गौळणी

याच्या संगसुखे गर्भव

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089808 · अभंग क्र. १७५

175.
याच्या संगसुखे गर्भवास घेता ।
येत जात गे कल्पाच्या चळथा ।
नेघो भुक्ति मुक्ति देता सायुज्यता ।
ऐशा गौळणी त्या सुखानंदभरिता वो ॥१॥
धन्य प्रेमळा त्या रंगल्या श्रीरंगी ।
नेणती दुसरे वो संसारी विरागी ।
हरिची भूषणे त्या लेऊनि निजांगी ।
सुखी सुखरुप भोगी नित्य त्यागी वो ॥२॥
याच्या सहवासे वो भोगिता निजभोग ।
भोगी भोगातीता सर्वदा नि:संग ।
नथेचि दृष्यावरी देखतीहि जग ।
ऐशा विचरती होऊनि अनंग वो ॥३॥
नित्य जनी वनी हरीते देखती ।
हरीचि होऊनिया हरीते भजती ।
हरिरुप झाली त्यांची अंगकांति ।
हरिचि मुसावला ध्यानी मनी चित्ती वो ॥४॥
येती जाती त्या हरिच्या सांगा ते ।
वसती नित्यकाळ हरि वसे जेथे ।
करिती भोजने त्या जेवविता हरीते ।
हरीविण त्या न घेती जीवनाते वो ॥५॥
निळा म्हणे तया हरीच सांगाती ।
त्याहि वर्तताती हरीच्या अनुवृत्ती ।
नाही उरविली दोनीपणे खंती ।
वसती एकएकी निजात्मता युक्ती वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग