वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ५. विरहिणी

एकी म्हणती हा आमुचा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089768 · अभंग क्र. १८२

182.
एकी म्हणती हा आमुचा सांगाती ।
दुजी म्हणे परती भाऊ माझा ॥१॥
तीजी म्हणे हरि आमुचा मेहुणा ।
चौथी म्हणे पैसुन्या देखणी झणे ॥२॥
एकी म्हणती हा आमुचा गोवळ ।
सहावी म्हणे बाळ नंदाचा की ॥३॥
निळा म्हणे जैशा श्रुती विवादती ।
तैशा या भांडती परस्परे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग