वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

सर्वांघटी वसे तो आम्

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090113 · अभंग क्र. १८२

182.
सर्वांघटी वसे तो आम्हा प्रकाशे । प्रत्यक्ष आम्हा दिसे गुरुकृपा ॥१॥
विराले ते ध्येय ध्यान गेले मनी । मनाची उन्मनि एक जाली ॥२॥
ठेला अहंभाव सर्व दिसे देव । निःसंदेह भाव नाही आम्हा ॥३॥
निवृत्ति साधन गयनिप्रसादे । सर्व हा गोविन्द सांगतुसे ॥४॥

अर्थ:
सर्व शरिरात तो परमात्मा एकत्वाने प्रकाश किंवा चैतन्य रुपाने वसत आहे पण तो फक्त गुरुकृने पाहता येतो. ध्येय ध्याता ध्यान ह्या त्रिपुटीचा निरास त्यानी केल्याने मन उन्मनाची एकच अवस्था झाली किंवा अवस्था लागली. त्या बोधाने अहंभाव गेल्याने सर्वत्र तो परमात्मा पाहता आल्याने माझ्या भावही निसंदेह पणे राहिला नाही.निवृतिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी नामाचे साधन सांगितल्यामुळे सर्वच त्या गोविदांची स्वरुप आहेत ह्याचे भान झाले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग