(बाळक्रीडा अभंग)
3876.
(बाळक्रीडा अभंग)
जावे बाहेरी हा नाठवे विचार । नाही समाचार ठावा काही ॥१॥
काही न कळे ते कळो आले देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥
कवतुकासाठी भक्त देहावरी । आणिताहे हरी बोलावया ॥३॥
यासि नांव रूप नाही हा आकार । कळला साचार भक्ता मुखे ॥४॥
मुखे भक्तांचिया बोलतो आपण । अंगसंगे भिन्न नाही दोघा ॥५॥
दोघे वेगळाले लेखिल जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥
तयासी घडली सकळ ही पापे । भक्तांचिया कोपे निंदा द्वेषे ॥७॥
द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेंवी प्राणा नाश करी ॥८॥
करिता आइके निंदा या संतांची । तया होती तेही अधःपात ॥९॥
पतन उध्दार संगाचा महिमा । त्यजावे अधमा संत सेवी ॥१०॥
सेवि संत जेडे महा लाभरासी । तूका म्हणे यासी नाश नाही ॥११॥
अर्थ :
सर्व गोपाळांना अंत:करणामधे कृष्णसुख झाले त्यामुळे त्यांना बाहेरही जावेसे वाटेना आणि बाहेरचे समाचारही ऐकावेसे वाटेना. या गोपाळांना आता काहीही कळत नाही त्यांना देहभावच राहीला नाही हे देवाला कळून आले. गोपाळांच्या अंत:करणामध्ये देवाविषयीचे कौतुक प्रवेश करु लागला. आपले कौतुक भक्तांनी सांगावे याकरीताच हरी भक्तांना देहभानावर आणीत होता व त्यांना बोलावित होता. खरोखर याला नांव नाही रुप नाही आकार नाही हे सर्व भक्तांच्या मुखानेच सर्वांना कळते. भक्तांच्या मुखानेच प्रत्यक्ष देव बोलत असतो कारण दोघेही अंगसंगतीने एकमेकापासून भिन्न नाहीत. देव आणि भक्त हे दोन्हीही वेगळे आहेत असे जो मानतो आणि असे जो सर्वांना सांगतो त्याचा पृथ्वीला खूप भार वाटतो. जो कोणी भक्तांवर रागावून त्यांची निंदा द्वेष करतो त्याच्याकडून सर्व प्र
