वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 239. जोहार ३८६२ ते ३८९८

जोहार मायबाप जोहार ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090418 · अभंग क्र. ३८८१

3881.
जोहार मायबाप जोहार । कायापूरशहर तेथील मी महार । पाहू जालो दरबार । धन्याचा की जी मायबाप ॥१॥ पाटील जीवाजीअवधारी । जो का ग्रामींचा सत्ताधारीं । परीदिवसाच करितो चोरी की जी मायबाप ॥२॥ आशा पाटलीण तोंडाळू फार । उगीच फीरतीदारोदार । सांगे अक्षयासी व्यवहार । फजितखोरकी जी मायबाप ॥३॥ मनाजीपंत कुलकर्णी । त्याचे हाती खतलेखणीं । त्याची जैशी जैशीकरणी । तिकडे तिकडे कुळे जाती की जी मायबाप ॥४॥ यमाजी बाबा हुजुरचा महालदार । त्याचेजीवावरील महार । त्यासींनाही पडला व्यवहार । दरबार शुध्द करावा की जी मायबाप ॥५॥ मगजीवाजी राहविलें । मुळच्या शिवाजीसआणविलें । पाटीलकीचें वस्त्रदान दिधले । ग्रामत्याजकडें लाविला की जी मायबाप ॥६॥ तेथीलसांडबुध्दी वाटली भली । गांवामध्ये अक्षयनांदविली । नित्य नेहमी बोलती जाहली । खरीकेली हाक देऊनी की जी मायबाप ॥७॥ मजमहाराची महारकी । फिरती असे अनेकीं । एकाजनार्दनीं लौकीकी । दिला पोषाख यदुविरे की जीमायबाप ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग