जोहार मायबाप जोहार ।
3896.
जोहार मायबाप जोहार । महार मीकायापूरीचा । जन्मोजन्मी वेस राख्या आहे यागांवींचा ॥धृ.॥ कायापूर कसबे लांबी साडेतीनगांव । तीनशें साठ पेठा तेथे नांदतो उमराव । चौदा चौक दहा रस्ते बसविले अपूर्व । दिधलीधन्यांने सनद जीवाजी पंतांचे नावे ॥१॥ शिवाजीपंतानें जीवाजी ठेवीला दिवाण । साही षड्विकारमिळाले त्यासमान । तुम्ही सर्व ऐका तुम्हांसीसांगतो खूण । आपआपणांमधी मिळूनी खातीभोंदून ॥२॥ कामाजी कोतवाल याने नागविलेंबहुतांशीं । हरिहराची अब्रुघेतो भय नाही त्यासी । जमदग्नि दुर्वास नाडिले महा महा ऋषी । क्रोधाजीफौजदार तोही मिळाला त्यासी ॥३॥ लोभाजीचौधरी याला पैशांची हांव । अंहकार पाटील त्यासीकांपे सर्व गांव । दंभाजी नाईक सर्व करितीहावहाव । दया नाही रयतेवर । केला उजाडचिगांव ॥४॥ जीवाजीपंतांचा हिशेब घ्या अवघाझाडा । नाहीतर त्याचे पायी घाला अनुहातखोडा । तरीच मायबाप हा गांव नांदेल बरा । एकजनार्दनीं पाय सद्गुरूचे धरा ॥५॥
