वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 239. जोहार ३८६२ ते ३८९८

जोहार मायबाप जोहार ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090435 · अभंग क्र. ३८९०

3890.
जोहार मायबाप जोहार । मीसूर्यवंशी रामजी पाटलांचा महार । त्याचे दरबारचाकारभार । मज नफराचें शिरी की ॥१॥ काय सांगूअयोध्यापद्रण । महास्थळ मनोहर जन । तेथेंनांदतें कोण कोण । ते सकळ जन परिसा की जीमायबाप ॥२॥ ते अयोध्येसी दिलपत राजा । त्याचे पोटी दशरथ वोजा । त्याचे शकुनावरतीफौजा । चालिल्यात की ॥३॥ त्याचे पोटी रामजगजेठी । कांबीट मोडली पणासाठीं । विन्मुखकरूनी रायाच्या कोटी । तंव मुक्ताई पर्णिलीकी ॥४॥ ती मुक्ताई आवा मोठी कनवाळा । टुकडादेती बाका शिळा । काय सांगतें वेळोवेळां । मजहरिख होतो की ॥५॥ परी मी जातीचा महार । धन्याचे चाकरीस सादर । सालोबाद धन्याचे घरचाकारभार । मीच करित आलो की ॥६॥ मगजाऊनि विष्णुबा कुळकाचे घरी । हकीकतसांगितली सारी । मग देउनी शिळी पाकी न्याहारी । मज बैस म्हणितले की ॥७॥ गाढा विष्णुबाकुळकर्णी । साऱ्या कारभाऱ्यांचा तो धनी । चौऱ्याऐंशी लांखांची वाटणी । तेणेंच केली की जीमायबाप ॥८॥ चौऱ्याऐंशी लक्ष वानभरे । विष्णुबाकुळकर्ण्याची खिल्लारें । पोषीत पाळीत वोहरें । ऐसेंच की ॥९॥ मग मृत्युलोकी उभविल्या पेठा । पूर्वीच्या निवृत्ती दाविल्या वाटा । सोडूनिया जुनाटवाटा । या आडवाटा जाऊ नका की॥१०॥मगमृत्युलोंकी केले येणे । गोउनी पाडिलें मागिल्यारिणे । फिटल्यावांचून समाधान । होत नाहीकी ॥११॥ अवघे पांच कोस शेत । पाडूनी केलेतण गवत । पडिकाचे पैसे बोभाट । होईल कीजी मायबाप ॥१२॥ सालोबाद मारितो हाका । वसूल करा दिवाणाचा टका । तोंवर येणे जाणेधोका । न वारें की ॥१३॥ मग आरोळी देउनीघातली उडी । एका काढील लवडसवडी । ऐकाते उत्तानी उफडी । वाहवलें की ॥१४॥ एकपडिले खळाळ धारें । वरतें पाय खालते शिरें । त्याचे हाल थोर थोर । देखिले की ॥१५॥ मगजाऊन जनार्दनबावाचें दरबारी । बैसोनि एकनाथपायरी । माप केले खरोखरीं । मागील भरोवरीचुकविली की जी मायबाप ॥१६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग