वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079528 · अभंग क्र. ३८९३

3893.
(बाळक्रीडा अभंग)
धरी दोही ठायी सारखाचि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥१॥
दोघे एके ठायी केली नारायणे । वाढविला तिणे आणि व्याली ॥२॥
व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणे मायबाप ॥३॥
माय हा जगाची बाप नारायणा । दुजा करी कोण यत्न यासि ॥४॥
कोण जाणे याचे अंतरीचा भाव । तुका म्हणे माव कळो नेदी ॥५॥

अर्थ :
वसुदेव, देवकी आणि नंद, यशोदा या दोघाच्याही ठिकाणी कृष्ण सारखीच भावना ठेवत होता. वसुदेव आणि देवकी यांनी कृष्णाला जन्म दिला तर नंद व यशोदा या दोघानी कृष्णाला वाढविले आणि दोघाच्याही ठिकाणी सारखीच भावना कृष्णाने धरली होती. खरे तर कृष्ण स्वत:हूनच जन्माला आला व स्वत:च्याच सामर्थ्याने वाढला केवळ निमित्त कारण म्हणून नंद, यशोदा आणि वसुदेव, देवकी हे मायबाप होते. खरातर नारायण हाच जगाचा मायबाप आहे याचे पालनपोषण करण्यासाठी कोण प्रयत्न करेन ? तुकाराम महाराज म्हणतात, या नारायणाच्या अंत:करणातील खरे काय आहे हे कोणाला कळू शकेल व तो नारायण देखील हे कोणाला कळू देखील देणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग